राजनाथसिंह यांचा श्रीलंका दौरा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
rajnath singhs historic visit to sri lanka political developments and reactions
धनुष्यबाण चिन्ह गोठविण्याची मागणी

‘बीआरएस’च्या दोन आमदारांना अटक
प्रज्ज्वल रेवण्णा पोलिसांच्या ताब्यात

‘समृद्धी’ला समांतर रेल्वे मार्ग प्रस्तावित

कोलंबो : संरक्षणमंत्री राजनाथसिंह तीन दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यावर कोलंबोमध्ये दाखल झाले. श्रीलंकेच्या उपसंरक्षण मंत्र्यांनी व भारतीय उच्चायुक्तांनी त्यांचे स्वागत केले. ३८ वर्षांत भारतीय संरक्षणमंत्र्यांचा हा पहिलाच श्रीलंका दौरा आहे. या दौऱ्यादरम्यान भारतीय नौदलाची ‘ आयएनएस उदयगिरी ’ ही युद्धनौका कोलंबो बंदरात दाखल झाली आहे.

धनुष्यबाण चिन्ह गोठविण्याची मागणी

मुंबई : ‘शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह आम्हालाच मिळाले पाहिजे. त्यासाठी आमचा न्यायालयीन लढा सुरू आहे. मात्र, निकालाला विलंब होत असेल तर संबंधित चिन्हाचा गैरवापर होऊ नये म्हणून ते गोठवण्याचा पर्याय न्यायालयात मांडण्यात आला आहे’, असे शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

‘बीआरएस’च्या दोन आमदारांना अटक

हैदराबाद : तेलंगणा विधानसभेचे अध्यक्ष गड्डम प्रसाद कुमार यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी बीआरएसचे दोन आमदार थाटा मधुसूदन आणि एन. नवीन कुमार रेड्डी यांना हैदराबाद पोलिसांनी अटक केली. विरोधकांना सभागृहात जाण्यापासून रोखल्यावर ही टिप्पणी करण्यात आल्याचा आरोप आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या विधानाला राज्याचा अपमान म्हटले, तर मधुसूदन यांनी हे आरोप फेटाळले.

प्रज्ज्वल रेवण्णा पोलिसांच्या ताब्यात

बेंगळुरू : परप्पना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहात मोबाइल वापरल्याप्रकरणी जेडीएसचे माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांना बेंगळुरूच्या विशेष न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. कारागृहातील त्यांच्या खोलीतून मोबाइल, पेनड्राइव्ह आणि चार्जर जप्त करण्यात आले होते. प्रज्ज्वल रेवण्णा हे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू असून, सध्या बलात्काराच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.

‘समृद्धी’ला समांतर रेल्वे मार्ग प्रस्तावित

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला समांतर नवीन हायस्पीड रेल्वे मार्ग तयार करण्याबाबत व्यवहार्यता तपासण्यास रेल्वेने सुरुवात केली आहे. मुंबई-नागपूर समर्पित रेल्वे मालवाहतूक मार्गासाठी हालचाली करताना या मार्गाची अलाइन्मेंट निश्चिती, फायदे-तोटे रेल्वेकडून तपासले जात आहेत.

   सविस्तर वृत्त... ४