Saptashringi Ghat Closed Until September 26 Major Traffic At Risk
सप्तशृंगी घाट उद्यापासून बंद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
सप्तशृंगी गड - नांदुरी घाटमार्गावरील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे हा महत्त्वाचा घाटरस्ता उद्या, गुरुवारपासून (दि. १०) सकाळी ७ वाजेपासून २६ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतचा आदेश कळवणच्या उपविभागीय अधिकारी डॉ. काश्मिरा संखे यांनी जारी केला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने तसेच रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
सप्तशृंगी गड- नांदुरी- अभोणा- कनाशी- मांगू- अलियाबाद या रस्त्याचे काँक्रिटीकरण केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू करण्यात येत आहे. सविस्तर वृत्त...५