Fatal Attack Two Friends Seriously Injured At Technical Institute
दोन विद्यार्थ्यांवरप्राणघातक हल्ला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
गावाशेजारील मुलीला त्रास देऊ नको, असे सांगितल्याच्या रागातून सामनगाव रोडवरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली. मित्राला वाचविण्यासाठी धावून गेलेल्या दुसऱ्या विद्यार्थ्यावरही कोयत्याने वार करण्यात आल्याने तोही गंभीर जखमी झाला. दोन्ही विद्यार्थ्यांची खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे.
सामनगाव येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयापासून रेल्वे पोलिस प्रशिक्षण महाविद्यालयाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील हनुमान मंदिर परिसरात ही हल्ल्याची घटना रविवारी रात्री घडली. या घटनेत अनिकेत बाजीराव खताळे (रा. पाटोळे, ता. सिन्नर) आणि सिद्धान्त खैरनार (रा. सटाणा) हे दोघे मित्र गंभीर जखमी झाले आहेत. सविस्तर वृत्त... २