विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू; मुलगा गंभीर जखमी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
मोहाडी तालुक्यातील ताडगाव येथे शेतात तुटून पडलेल्या विद्युत वाहिनीचा धक्का लागून ६५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू तर त्यांचा ३३ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. महावितरणच्या जीर्ण वाहिनीमुळे हा अपघात झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे
गणेश केशव गिरी (६५) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून दुर्गेश गणेश गिरी (३३) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. वडील आणि मुलगा दोघेही शेतात पिकांना खत देण्यासाठी गेले असताना शेतात तुटून पडलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून हा अपघात घडला. विद्युत वाहिन्यांच्या देखभालीवरील दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडल्याचे स्पष्ट होत असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.