मतदार यादीत नाव शोधा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
special campaign to check names in the voter list
नागपूर : राज्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील सर्व मतदारांनी मतदार यादीत आपले नाव तपासून घ्यावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सचिन कुमावत यांनी केले आहे. मतदार यादीत नाव आढळलेली नाहीत, त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात किंवा voters.eci.gov.in या संकेतस्थळावर तसेच ‘Voter Helpline App’द्वारे ऑनलाइन नमुना क्र. ६ भरून नाव नोंदणी करावी. मतदारांच्या सोयीसाठी विशेष नोंदणी मोहीम राबवली जात असल्याचे विभागाने म्हटले आहे.