११० गोवंशांची सुटका

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
release of 110 cattle from slaughter in nagpur arrest of two
नागपूर : पोलिस उपायुक्त रमेश धुमाळ यांच्या विशेष पथकाने छापा टाकून कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या तब्बल ११० गोवंशांची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी मुश्ताक कुरेशी (रा. कामठी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. कुरेशी याच्या गादा गावातील शेतात कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणात गोवंश डांबून ठेवण्यात आल्याची माहिती धुमाळ यांना मिळाली. विशेष पथकाने शेतात छापा टाकला.

महिलेसह दोघे तडीपार
नागपूर : गुन्हेशाखा पोलिसांनी तडीपार असलेल्या महिलेसह दोघांना सापळा रचून अटक केली. अफसाना धनीराम धनावत वय ४० व रवी ऊर्फ सतीश श्रावण कैकाडे वय ४२ दोन्ही रा. प्रेमनगर, शांतीनगर,अशी अटकेतील तडीपार गुंडांची नावे आहेत. पोलिस उपायुक्तांनी दोघांनाही एक वर्षासाठी शहर व जिल्ह्यातून तडीपार केले. तडीपार असतानाही दोघे प्रेमनगर भागात राहायचे. याबाबत गुन्हेशाखेच्या युनिट तीनला माहिती मिळाली होती.

युवकाची आत्महत्या

नागपूर : अंबाझरी तलावात उडी घेऊन ३० वर्षीय युवकाने आत्महत्या केली. सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास युवकाचा मृतदेह तरंगताना आढळला. मृताची ओळख पटलेली नाही. अंबाझरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.