‘रजनीगंधा’स मनाई, बॅरेल कॅफेला लावली आग

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
rajinikanth case fire set to barrel cafe nine lakhs worth of damage
रजनीगंधाचे पाकीट नेण्यास मनाई करून अपमानित केल्याने शिवाजीनगरमधील ‘द बॅरेल कॅफे’ला आग लावण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या आगीत नऊ लाखांचे साहित्य जळून राख झाले. अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून शेफसह दोघांना अटक केली. मोहनलाल तिवारी आणि शुभम विश्वकर्मा अशी आरोपींची नावे आहेत. शुभम हा शेफ आहे.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, ५ सप्टेंबरला मोहनलाल मित्रांसह कॅफेत आला. मोहनलाल याच्याकडे रजनीगंधाचे पाकीट होते. सुरक्षा रक्षकाने त्याला मनाई केली. अपमान झाल्याने मोहनलाल संतापला. पहाटे ४ वाजताच्या सुमारास तो शुभमसह शिवाजीनगरमध्ये आला. लहान गेटवरून उडी मारून दोघेही आत घुसले. बाटलीत पेट्रोल टाकून आग लावली. आगीत पाच एसीसह नऊ लाख रुपये किमतीचे साहित्य जळून राख झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोघांनी आग लावल्याचे स्पष्ट झाले.