One sided Love Leads To Sexual Harassment Of Student Shocking Incident In Youth Society
एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीचा विनयभंग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नागपूर : नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या २१ वर्षीय विद्यार्थिनीचे छायाचित्र मॉर्फ करून समाजमाध्यमावर व्हायरल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी युवकाविरुद्ध विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. संकेत भोंगाळे (वय २२) रा. रमणा मारुती चौक, असे आरोपीचे नाव आहे. एक वर्षापूर्वी क्रिकेट सामन्यादरम्यान तरुणी व संकेतची ओळख झाली. दोघांमध्ये मैत्री झाले. आठ महिन्यांपूर्वी संकेतने समाज माध्यमावरून मेसेज पाठवून तरुणीला प्रपोज केले. तिने नकार दिला. केवळ मित्र असल्याचे सांगितले. त्यानंतर तो सतत मेसेज पाठवून तिला त्रास देऊ लागला. तिचा पाठलागही करायचा. ऑगस्ट महिन्यात तरुणीने संकेतविरुद्ध नंदनवन पोलिसांत तक्रार दिली. मात्र त्यानंतरही त्याने तरुणीचा छळ सुरूच ठेवला. तिचे छायाचित्र मॉर्फ करून समाजमाध्यमावर व्हायरल केले. याबाबत कळता तरुणीने नंदनवन पोलिसांत तक्रार दिली.