Ganesha Idol Collapses Injuring Two Workers In Dharavi
गणेशमूर्ती कोसळून दोघे जखमी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
मुंबई : ‘भुलेश्वरचा राजा’ची मूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बसलेल्या धक्क्यातून मुंबईकर सावरत असताना मंगळवारी आणखी एक गणेशमूर्ती दुर्घटनाग्रस्त झाली. धारावी येथील ओम शक्ती फाऊंडेशनची १५ फुटी गणेशमूर्ती कोसळून दोन कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. धारावीच्या प्रेमनगर येथील ओम शक्ती फाऊंडेशनच्या राजाचे मंगळवारी आगमन होते. कुर्ला पश्चिमेकडील बैल बाजारमधून १५ फूट उंचीची गणेशमूर्ती कार्यकर्ते धारावीकडे घेऊन जात होते. सायंकाळी शीतल तलावाजवळ गतीरोधकावरून मूर्ती घेऊन जाणारी ट्रॉली कार्यकर्त्यांनी ओढली असता मूर्ती ट्रॉलीवरून उजव्या बाजूला कलंडली.
धनुष्यबाण चिन्ह गोठविण्याची मागणीमुंबई : ‘शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह आम्हालाच मिळाले पाहिजे. त्यासाठी आमचा न्यायालयीन लढा सुरू आहे. मात्र, निकालाला विलंब होत असेल तर संबंधित चिन्हाचा गैरवापर होऊ नये म्हणून ते गोठवण्याचा पर्याय न्यायालयात मांडण्यात आला आहे’, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
प्रज्ज्वल रेवण्णा पोलिसांच्या ताब्यात
बेंगळुरू : परप्पना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहात मोबाइल वापरल्याप्रकरणी जेडीएसचे माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांना बेंगळुरूच्या विशेष न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. कारागृहातील त्यांच्या खोलीतून मोबाइल, पेनड्राइव्ह आणि चार्जर जप्त करण्यात आले होते. प्रज्ज्वल रेवण्णा हे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू असून, सध्या बलात्काराच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. पुढील चौकशीसाठी न्यायालयाने त्यांना व सह-आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केले.