मनोज जरांगे यांची वैद्यकीय तपासणी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
manoj jarandes medical condition after hunger strike
मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी रात्री अडीचनंतर सलाइन लावून घेतले. त्यांची मंगळवारी सकाळी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांच्या उपोषणाला ११ दिवस पूर्ण झाले असून त्यांचे वजन कमी झाले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी दिली. दरम्यान, मुंबईतील आंदोलनावर ठाम असल्याचा जरांगे यांनी पुन्हा सांगितले.

जरांगे म्हणाले, की न्यायमूर्ती शिंदे समितीच्या दौऱ्यात काहीही होणार नाही. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची ती एक चाल आहे. हैदराबाद गॅझेटप्रमाणे प्रमाणपत्र पडताळणी न देता सरकारने वर्षभर फसविले आहे. सरकारचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत आले नाही तरी चालेल. दरम्यान, कुणबी प्रमाणपत्रे वाटप करण्यासाठी तालुकास्तरावर शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
 संबंधित वृत्त...३