Murder Of A Youth With A Sharp Weapon In Wagholi An Atmosphere Of Fear In Chamorshi Taluka
वाघोली शिवारात तरुणाची धारदार शस्त्राने हत्या
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील वाघोली शिवारात एका तरुणाची धारदार शस्त्राने डोक्यावर वार करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत तरुणाची ओळख पटली असून नंदकिशोर मोतीलाल मिश्रा ऊर्फ बंटी (३४), रा. मूल (चंद्रपूर), असे त्याचे नाव आहे. चामोर्शी तालुक्यात तीन दिवसांच्या कालावधीत दोन खुनाच्या घटना घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.