शिंदे यांच्यावर टीका नको

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
no criticism on eknath shinde demand for maratha reservation
व्यापारी जखमी

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी उपोषण करीत असलेल्या मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एकेरी भाषा वापरली आहे. त्यांनी शिवराळ भाषा वापरू नये. सर्व मराठा समाज एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे, असे मत सागर देवकर यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. अंतरवाली येथे जरांगे उपोषण करीत असताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली होती. मराठा आरक्षणासाठी शिंदे यांनी नेहमची सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका करू नये, असे देवकर यांनी सांगितले. या वेळी सुहास बागल, विजय वाघ, पांडुरंग पाटील आदी उपस्थित होते.
व्यापारी जखमी

छत्रपती संभाजीनगर : हडको एन ११ भागात रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला रिक्षाने धडक दिली. जखमी झालेल्याचे नाव शेख रशिद अहेमद असे आहे. ही घटना ४ सप्टेंबर रोजी दुपारी दोनला घडल्याचे पोलिसांनी सांगितले.