फिजिओथेरपी दिनी ‘वॉकेथॉन’ला प्रतिसाद

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
physiotherapy day walkathon a unique initiative to raise health awareness
जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त मंगळवारी (आठ सप्टेंबर) शहरात आयोजित ‘ वॉकेथॉन ’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात शहरातील पाच फिजिओथेरपी महाविद्यालयांचे विद्यार्थी तसेच शहरातील फिजिओथेरपिस्ट सहभागी झाले होते.

महापौर समीर राजूरकर, महापालिकेचे आयुक्त अमोल येडगे, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, छावणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आकांक्षा तिवारी, फिजिओथेरपी संघटनेचे शहर अध्यक्ष डॉ. शुशांक पवार, सचिव डॉ. प्रशांत पार्धे आदींच्या उपस्थितीत सूतगिरणी परिसरातील विभागीय क्रीडा संकुलापासून वॉकेथॉनला सुरुवात झाली. त्यानंतर दर्गा चौक, सावरकर चौक व पुन्हा क्रीडा संकुलापर्यंत वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, फिजिओथेरपीच्या प्रचार-प्रसाराच्या हेतूने आयोजित वॉकेथॉनमध्ये विद्यार्थी व फिजिओथेरपिस्ट लक्षणीय प्रमाणात सहभागी झाले होते. याच दिनाचे औचित्य साधत रविवारी (सहा सप्टेंबर) फिजिओथेरपी शिबिरही घेण्यात आले. या शिबिराचा २०० रुग्णांनी लाभ घेतला.