Rashtriya Swayamsevak Sanghs Awareness Campaign Against Dj
रा. स्व. संघदेखील ‘डीजे’विरोधात दक्ष
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
सर्वसामान्य पुणेकरांबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातूनही आता ‘ डीजे ’ला विरोध होऊ लागला आहे. समन्वयाने, सहकार्याने, प्रबोधनाच्या माध्यमातून ध्वनिप्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांचे प्रबोधन आणि मतपरिवर्तन अभियान राबवले जाणार आहे. संघाचे स्वयंसेवक, परिवारातील संघटनांचे पदाधिकारी समाजमाध्यमातून सर्व उत्सव ध्वनिप्रदूषणमुक्त असावेत, अशी भूमिका मांडत आहेत.
‘ध्वनिप्रदूषणाला सर्वांचाच विरोध आहे; परंतु त्यासाठी आक्रमक भूमिका घेणे, उत्सव, पालखी सोहळ्यासारख्या आस्थेच्या विषयांना दूषण देणे योग्य नाही. महापुरुषांनीही संवाद आणि प्रबोधनाच्या माध्यमातूनच परिवर्तन घडवून आणले. आम्ही संवादाच्या माध्यमातून ही प्रक्रिया सुरू करत आहोत,’ असे संघ परिवाराशी संबंधित सूत्रांनी सांगितले.