पुणे : नाडगोंडे रेव्हन्स संघाने पीवायसी हिंदू जिमखान्यातर्फे आयोजित पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन लीगमध्ये सेइनुमेरो रॉकेट्स संघावर ४-३ अशी मात केली. रेव्हन्स संघाचा हा दुसरा विजय ठरला. गेल्या सामन्यात रेव्हन्स संघाने इम्पेरिअल स्वान्स संघावर ५-२ अशी मात केली होती.
पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. निकाल : नाडगोंडे रेव्हन्स वि. वि. सेइनुमेरो रॉकेट्स ४-३ (प्रतीक धर्माधिकारी-केदार नाडगोंडे वि. वि. दीप्ती सरदेसाई-समीर जालन १५-८, १५-७; प्रांजली नाडगोंडे-समीर सावला पराभूत वि.अनिकेत सहस्रबुद्धे-वरुण साहू ४-१५, १-१५; अविनाश दोशी-चंद्रशेखर आपटे वि. वि. नीलाश केळकर-हेमंत पाळंदे १५-१०, १२-१५, १७-१५; मनीष शहा-विश्वास मोकाशी पराभूत वि. आशुतोष सोमण-मंदार विंझे १५-१०, ९-१५, १३-१५; आशय कश्यप-विनीत राठी पराभूत वि. रोहित मेहेंदळे-समीर जोग १०-१५, ९-१५; चिन्मय चिरपुटकर-पृथ्वी शहा वि. वि. तुषार मेंगाळे-क्षितिज कोतवाल १५-८, १५-४; रिआन करंदीकर-सारा नवरे वि. वि. संस्कृती जोशी-सोहम जोशी १५-१०, १५-१३).