Road Safety Awareness And Literacy App Distribution For Students
रस्ते अपघातांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘रोटरी क्लब ऑफ छत्रपती संभाजीनगर एलाइटत’र्फे वत्सलाबाई पाटील माध्यमिक विद्यालयाच्या दहावीच्या मुलांसाठी ‘ लिटरसी ॲप ’ची भेट देण्यात आली. यानिमित्ताने रस्ता सुरक्षा जागृती अभियानावर विद्यार्थ्यांना आरटीओचे सहायक वाहन निरीक्षक संदीप शेलार यांनी मार्गदर्शन केले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये दर वर्षी ७०० हून अधिक रस्ते अपघात होतात. या वेळी क्लबच्या अध्यक्ष डॉ. माधुरी जोशी, सचिव अशोक देवरे, डॉ. छाया महाजन, उत्तम शिरसाठ, माधुरी सांगवीकर, डॉ.अंजली भालचंद्र, विश्वास जोशी, स्वाती स्मार्त, मुख्याध्यापक शैलेंद्र पाटील, मुख्याध्यापिका स्मिता चव्हाण, विलास बडक उपस्थित होते. सूत्रसंचालन अदिती कवठाळे व रिद्धी उदावंत यांनी केले.