एसटीच्या लाइन चेकर, वाहकामध्ये हाणामारी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
st bus brawl serious incident occurred in front of passengers
तपासणीच्या कारणावरून मार्ग तपासणी (लाइन चेकिंग) पथकातील कर्मचारी व रिसोड आगाराच्या वाहकामध्ये प्रवाशांसमोरच वादाची ठिणगी पडली. हे प्रकरण वाढत गेल्याने एकमेकांना मारहाण करण्यापर्यंत पोहोचले. मेहकर बसस्थानकावर मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मेहकर बसस्थानकावर मार्ग तपासणी पथक दुपारी हजर होते. त्याचवेळी वाशीम जिल्ह्यातील रिसोड आगाराची मानव विकासची मेहकर बस पोहोचली. प्रवासी उतरत असतानाच चेकिंग पथकाने तपासणी सुरू केली. यावेळी कर्मचारी आणि वाहकात वाद भडकला. शाब्दिक भडका उडाल्यानंतर त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले.