वैष्णवी आडकरची विजयी सलामी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
vaishnavi adkar wins against japanese player in itf tennis tournament
पुणे : महाराष्ट्राच्या वैष्णवी आडकर हिने महिलांच्या आयटीएफ टेनिस स्पर्धेतील एकेरीत विजयी सलामी दिली.

गुइयांग (चीन) येथे ही स्पर्धा सुरू आहे. पहिल्या फेरीत वैष्णवीने जपानच्या कायो निशिमुरावर ६-२, ६-० अशी सरळ सेटमध्ये मात केली. पहिल्या सेटमध्ये सुरुवातीला दोघींत २-२ अशी बरोबरी होती. त्यानंतर, वैष्णवीने एकही गेम गमावली नाही. वैष्णवीची आता अमेरिकेच्या हिना इनुएशी लढत होईल.