इगा स्वियातेकलाचीनच्या झेंगचा धक्का

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
इगा स्वियातेकलाचीनच्या झेंगचा धक्का
न्यूयॉर्क : चीनच्या झेंग क्विन्वेन हिने अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेत सनसनाटी विजय मिळवला. तिने महिला एकेरीच्या चौथ्या फेरीत माजी विजेत्या इगा स्वियातेकला पराभवाचा धक्का दिला आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

जागतिक क्रमवारीत झेंग १२१व्या, तर पोलंडची स्वितायेक आठव्या क्रमांकावर आहे. स्वियातेकने २०२२मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली असून, तिने सहा ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. तिचे पारडे जड मानले जात होते. मात्र, जवळपास दोन तास लढत देऊन झेंगने तिचे आव्हान परतवून लावले. झेंगने स्वियातेकला ७-५, ६-३ असा पराभवाचा धक्का दिला. सलग दुसऱ्या सामन्यात ०-५ अशी पिछाडी भरून काढत ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या झेंगने विजय मिळवला. उपांत्यपूर्व लढतीत झेंगचा सामना दुसऱ्या मानांकित एलेना रायबाकिना हिच्याशी होईल. रायबाकिना हिने माजी विजेत्या नाओमी ओसाकाला ६-१, ६-४ असे पराभूत केले.
पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीत फ्रान्सच्या आर्थर गिया याने मंगळवारी विक्रमाची संधी गमावली. तो अमेरिकन ग्रँड स्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारणारा पहिला ‘लकी लूझर’ (पात्रता फेरीत पराभूत होऊनही मुख्य फेरीत प्रवेश मिळणारा टेनिसपटू) होता होता राहिला. नेदरलँड्सच्या बॉतिच व्हॅन डी झँडशल्प याने गिया याची झुंज ३-६, ६-७ (०-७), ७-६ (९-७), ७-६ (७-३), ६-४ अशी परतवून लावली. ही लढत पाच तास, १३ मिनिटे सुरू होती. अग्रमानांकित जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव याने इटलीच्या लुसिआनो दारदेरीवर ६-२, ६-२, ७-६ (७-३) अशी मात केली.

गतविजेत्या अरिना सबालेन्काने महिला एकेरीतून उपांत्य फेरी गाठली. बेलारूसच्या सबालेन्काने चेकियाच्या लिंडा नोस्कोवावर ७-६ (१), ३-६, ७-६ (१०-७) असा संघर्षपूर्ण विजय नोंदवला.